Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारताचे हरवलेले हे 6 खजाने सापडले तर महासत्ता होण्यास विलंब लागणार नाही.

798

हजारो वर्षांचा रोमांचक इतिहास असणारा असा  भारत देश हा जगातल्या काही प्राचीन देशांपैकी एक आहे. असं म्हणत की पूर्वी आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत असे. असच हे सोनं आजही आपल्या भारतातील विविध संस्कृती आणि धार्मिक कार्यांचा एक महत्वाचा भाग आहे. अधिककरून विविध दागिने आणि गुंतवणूक ह्यासाठी भारतात सोन्याचा वापर केला जातो. आणि सोने, चांदी इत्यादींचा इतिहास हा शेकडो वर्ष जुना आहे. असं म्हणतात जुन्या काळातील राजा महाराजांच्या राजस्त्रीया आजच्या महिलांपेक्षा कितीतरी जास्त पटीने सोनं धारण करीत असत. आजही सोनं धारण करणं हे मानाचं चिन्ह मानलं जातं.

परंतु दुर्दैवाने इतिहासातील भारतावर झालेल्या बऱ्याच आक्रमणांमुळे आपल्या देशातील सोन्याचांदीची प्रचंड प्रमाणात लूटमार झाली. इंग्रजांनीही आपल्या भारतला बरच लुटलं त्यामुळे साहजिकच आजचा भारत हा त्या काळातील भारतापेक्षा आपल्याला वेगळा बघायला मिळतो. परंतु बर्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आजही आपल्या भारतामध्ये पुष्कळ सोनं हे खजिन्याच्या रूपात दडलेलं आहे. असे अनेक खजिने भारतात उत्खननामध्ये सापडले आहेत. आताच नजिकच्याच काळात भारतात उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे एक खूप मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. ज्यावरून आपल्याला अश्या खजिन्यांचा अंदाज येऊ शकतो.

चला तर मग, आज ह्या लेखात InfoBuzz सोबत घ्या अश्याच काही अद्भुत खजिन्यांचा शोध, जे काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत आणि चिरकाळासाठी गुप्त राहिले आहेत.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

1. ग्रोसवेनोर जहाज | Wreck of the Grosvenor (South Africa)

ग्रोसवेनोर जहाज हे ईस्ट इंडिया कंपनीचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात श्रीमंत जहाज होतं. असं म्हणतात की ह्या जहाजात चौदा हजार सोन्याच्या सळ्या, एकोणीस असे पेटारे ज्यांच्यात जडजवाहीर आणि सोनं भरलं होतं, आणि सव्वीस लाख सोन्याची नाणी होती. हे जहाज 1780 साली चेन्नईहून इंग्लंडला श्रीलंकेच्या मार्गाने निघालं होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाउन जवळ हे जहाज बुडलं. हे जहाज अजूनही कोणाला सापडलेलं नाही. समुद्राच्या तळाशी हे जहाज दडलेलं आहे. आणि ह्या जहाजामधे जो काही खजिना होता  त्या खाजिन्याची किंमत त्या काळात 75000 युरो इतकी होती. साधारण दोनशे चाळीस वर्षांपूर्वीचे 75000 युरोस म्हणजे आजच्या काळात ह्या रकमेचा तुम्ही अंदाज लावू शकता. आणि हे जहाज बुडल्यानंतर ह्यातील खजिना शोधण्याचे प्रयत्न खूप वेळा केले गेले. परंतु आजतागायत ह्या जहाजाचा शोध लागू शकलेला नाही

2. नादीरशहाचा रक्तरंजित खजिना | Nadir Shah’s treasure

नादीरशहा हा भारतीय इतिहासामध्ये एक लूटमार आणि अतिशय भयंकर,आक्रमक अश्या राजाच्या रूपात ओळखला जातो. नादीरशहाच्या युद्धांबद्दल आणि त्याच्या शासनाबद्दल तुम्ही बर्याच गोष्टी ऐकल्या, पहिल्या असतील. 1736 साली नादीरशहा हा इराण ह्या देशाचा राजा होता. त्यानंतर  त्याची नजर भारतावर पडली आणि 1739 साली त्याने भारतावर आक्रमण केलं. आपल्या पन्नास हजार सैनिकांना घेऊन त्याने दिल्लीवर आक्रमण केलं ज्याने दिल्लीमध्ये प्रेतांचे ढीगच ढीग रचले गेले. त्याला दिल्ली लुटून आपल्या अधिपत्याखाली आणायची होती. त्याने दिल्लीला लुटलं खरं परंतु तो दिल्लीवर शासन करू शकला नाही. असं म्हणतात की नादीरशहाने भारतातील इतकी संपत्ति लुटली की जेव्हा त्याचा सगळा काफिला हा भारतातून जात होता तेव्हा त्याची लांबी 150 मैल म्हणजे साधारण 240 किमी इतकी होती.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

त्या काफिल्यात त्याने लुटलेली सगळी धनदौलत होती. त्याने बरेच तत्कालीन प्रसिद्ध खजिनेसुद्धा लुटले होते. कोहिनूर हिरा लुटणारा हाच तो नादीरशहा. परंतु दिल्लीला लुटून परत जात असतानाच नादीरशाहची त्याच्याच तंबू मध्ये त्याच्याच सैनिकांनी हत्या केली.नादीरशहाच्या हत्त्येनंतर हा सगळा खजिना अहमद शहा दूर्रानिकडे गेला. परंतु काही दिवसांनंतर अहमद शहा दुर्राणीचा काही आजारानी  मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच त्याने तो खजिना कुठेतरी लपवून ठेवला होता. एक कोहिनूर आणि काही हीरे वगळता तो खजिना नेमका कुठे आहे ह्याचा शोध लागू शकलेला नाही.

3 मीर उस्मान आली खानचा गुप्त खजिना | Treasure of Mir Osman Ali, Hyderabad

मीर उस्मान आली खान हे त्यांच्या काळातले एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होते जे एके काळी हैद्राबादचे निजाम होते. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या राज्यातल्या सोई सुविधा ह्या इंग्लंड च्या तोडीस तोड होत्या. साल 2008 साली फोर्ब्स ह्या आंतरराष्ट्रीय पत्रकाने मीर उस्मान खान ह्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये चौथ्या क्रमांकावर केला होता. आणि 1937 साली TIMES ह्या पत्रकाने मिर उस्मान आली खान यांचा उल्लेख  ‘जगातील सर्वात श्रीमंत माणूस’ असा केला होता.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

त्यांचं शासन सुरू असताना मिर उस्मान खान हे हैद्राबादमधील किंग कोटी पॅलेस मध्ये राहत असत. आणि ह्याच पॅलेस मध्ये त्यांनी त्यांची धनदौलत, त्यांचा सर्व खजिना कुठल्या तळघरात लपवून ठेवला होता. ज्या वेळी हैदराबाद संस्थान हा भारताचा भाग झाला तेव्हा ह्या खजिन्यातील काही भाग भारत सरकारने मिळवला परंतू ह्या खजिन्याचा बराचसा भाग कुठे आहे हे आजपर्यंत कोणीही शोधू शकलेलं नाही. असा अंदाज लावला जातो की आजच्या काळात त्यांच्या ह्या गुप्त खजिन्याची किमत साधारण 33 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

4. पद्मान स्वामी मंदिर, एक गूढ तिजोरी | Padmanabhaswamy Temple Chamber B, Kerala

पद्मान स्वामी मंदिर हे केरळमधील तिरूअनंतपुरम इथे आहे. हे मंदिर जगातल्या सर्वात श्रीमंत हिंदू मंदिरांपैकी एक आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून जेव्हा ह्या मंदिराच्या तळघरातली एक खोली उघडली गेली तेव्हा संपूर्ण जग हैराण झालं होतं. ह्या तळघरमध्ये सहा तिजोरया होत्या ज्याच्यातल्या पाच तिजोरया उघडल्या गेल्या आणि ह्या पाच तिजोऱ्यात जे काही दिसलं ते सरकारी कर्मचार्यांना चकित करणारं होतं.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

सोन्याची भांडी, मुकुट, जडजवाहीर, दागदागिने, हीरे  असं बरच काही त्या तिजोर्यांमध्ये होतं, तळघरात मिळालेल्या ह्या खजिन्याची आंतरराष्ट्रीय किंमत होती सुमारे 22 अरब डॉलर्स. परंतु ह्यातील सहाव्या तिजोरीला अजून उघडलं गेलेलं नाही. ह्याचं खरं कारण कळण अशक्य आहे. काही लोक म्हणतात की ही तिजोरी जर कोणी उघडली तर प्रलय येऊन सगळं जग नष्ट होऊ शकतं तर काही लोकं म्हणतात की ह्या तिजोरीचं रक्षण एक नाग करतो आहे तर काही लोक म्हणतात की ह्या तिजोरीला उघडण एक अपशकुन आहे.

5. सोन भांडारची गूढ गुहा | Sonbhandar Caves, Bihar

बिहारमधील सोन भांडार ही एक गुफा आहे ज्यामधे महाराज बिंबिसार ह्याचा सगळा खजिना आहे असं मानलं जातं. असं म्हणतात की हा खजिना मिळवण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले होते. परंतु ते सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. एवढच नाही तर इंग्रजांनी हा खजिना मिळवण्यासाठी गुहेवर तोफा डागल्या होत्या पण ते प्रयत्न सुद्धा असफल राहिले होते.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

ह्याच गुहेत एक गुप्त खोली आहे आणि लोकांचा असं समज आहे की ह्या खोलीचा उपयोग खजिन्याचं रक्षण करणार्या सैंनिकांसाठी केला जात असावा. असं म्हणतात की ह्याचं गुहांमध्ये त्या खजिन्याचा रस्ता लिहिलेला आहे परंतु ती लिपि एक गूढ लिपि असून ती कोणालाही अजून वाचता आलेली नाही.

6. कृष्णा नदीत दडलय काय : Krishna river treasure, Andhra Pradesh

साल 1518 ते 1687 ह्या काळामध्ये कुतुबशाहीची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये हा खजिना आहे असं म्हटलं जातं. ही जागा त्या काळीही हिऱ्यांच्या खजिन्यासाठी प्रसिद्ध होती. असं म्हणतात की जगातले दोन सुप्रसिद्ध  हीरे कोहिनूर आणि कूब हीरे हे देखील इथेच सापडले होते. साधारण चौदाव्या शतकामध्ये येथून हीरे खणून काढण्यात आले होते.

bharatkakhajana, sonbhadra, interestingfact, 6 Lost treasures of India in Marathi, भारतीय खजाने, मराठी माहिती, Marathi Facts, Indian treasure, Padmanabhaswamy Temple, Wreck of the Grosvenor, Nadir Shah’s treasure, Mir Osman Ali, Sonbhandar Caves, Krishna river treasure

तेव्हा भारत हा जगभरात हिऱ्यांच्या उत्पादनामधील एक अग्रेसर देश होता. परंतु ही हिऱ्यांची खाण नेमकी होती तरी कुठे ह्याचा आतापर्यंत कोणीही अंदाज लावू शकलेलं नाही. अजूनही मानतात की हिर्यांचं खूप मोठ भंडार नदीच्या तळाशी आहे ज्याचा शोध आजपर्यंत नाही लागलेला.  

वाचून थक्क झालात ? आजच्या काळात भारताला हा खजिना सापडला तर काय होईल? तुम्हाला काय वाटत कमेंट करून कळवा.   

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More