Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

इंग्लंडची थंडी जीवावर आली पण बापूंनी मांस न खाण्याची प्रतिज्ञा मोडली नाही.

319

मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपले लाडके बापू. फक्त भारतालाच नव्हे तर अख्या जगालाच अहिंसा शिकवणाऱ्या बापूंचे अनुयायी जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. आजही जग बापूंचे नाव मोठ्या आदराने घेतो. विख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणतात,

‘महात्मा गांधी नावाचा हाडामांसाचा एक माणूस या पृथ्वीवर होऊन गेला, यावर पुढील पिढ्या कदाचित विश्‍वास ठेवणार नाहीत,

माणूस जितका मोठा तितके गैरसमज सुद्धा जास्त. बापूंच्या बाबतीतही भारतात तेच घडलय. आजही महात्मा गांधीजीच्या बद्दल दंतकथापासून अपसामंजापर्यंत आणि अफवांपासून सांगोवांगीच्या गोष्टीपर्यंतचं बरंच काही ऐकलं आणि ऐकवलं जाते. आजचा हा लेख आहे बापूंच्या पहिल्या परदेशवारीचा ज्यातून तुम्हाला बापूंचा अनेक गुण पाहायला मिळतील.

मोहनदास गांधी यांच्या पहिलाच परदेश प्रवास. शिक्षणानिमित्त बापू लंडनला चालले होते. त्याकाळी परदेशाला बोटीने जायचे. बोटीने जाताना सागरी प्रवासात प्रचंड थंडी असायची. रात्रीच्या वेळी बापूंचा लंडनला जायचा प्रवास चालू झाला. बापू अक्षरशः कुडकुडत होते. बाकी लोक शरीरात उब निर्माण करण्यासाठी मद्यपान करत होते. थोड्या वेळात अनेकांचे लक्ष थंडीने कुडकुडणाऱ्या बापूंकडे गेले आणि त्यांनी बापूंना मद्यपान करण्याचा सल्ला दिला. त्याला गांधीजींनी स्पष्टपणे नकार दिला. थोड्या वेळाने बापुना जास्तच त्रास होऊ लागला आणि एक व्यक्ती त्यांना म्हणाली,

‘थंडी खूप आहे. दारू प्यायला नाहीस तर थंडीने काकडून मरशील,

पण गांधीजींनी मद्यपान करण्यास शेवटपर्यँत नकार दिला आणि आपल्या आईला दिलेली प्रतिज्ञा पाळली.

असाच आणखी एक प्रसंग झाला तो बॅरिस्टरची पदवी घेण्यापूर्वी. त्यावेळी बॅरिस्टरची पदवी घेण्यापूर्वी प्रत्येक पार्टीला उपस्तीथी दाखवणे गरजेचे होते. आणि या समारंभात मांसाहारावर जास्त जोर असायचा पण बापूनी तिथेही आपली प्रतिज्ञा मोडली नाही आणि मांसाहार करण्यास नकार दिला. लंडनमध्ये कायम थंड वातावरण त्यामुळे लोक शरीरात उब निर्माण करण्यासाठी मद्यपान आणि मांसाहार करायचे पण बापूनी कधीच केला नाही. त्यांचे प्रियजन आणि मित्रपरिवार त्यांना मद्यपान आणि मांसाहार करण्याचा आग्रह कायमच करायचे. एकदा तर त्यांनी कंटाळून ‘लंडनच्या थंडीत मांसाहार केला नाही तर मरशील’ असे अनेक पुस्तकातील पुरावे सुद्धा दिले पण बापूंवर काहीही परिणाम झाला नाही.

अखेर ज्याची भीती वाटत होती ती घटना घडलीच. बापू लंडनच्या कडाक्याच्या थंडीत आजारी पडले. डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर त्यांनी बापुना जास्तीतजास्त मद्यपान आणि मांसाहार करण्याचा सल्ला दिला. बापूनी तो सल्ला ना मानल्यामुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले. मित्र मंडळींनी बापुना तात्काळ डॉक्टरांकडे नेले तेव्हा ते म्हणाले,

मांसाहार केला तरच शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही आजारातून उठू शकाल.

तेव्हा बापूनी त्याला स्पष्टपणे नकार देत आपल्या आईला मद्यपान आणि मांसाहार न करण्याची शपथ दिली असल्याचे सांगितले. तेव्हा डॉक्टर समजावण्याच्या सुरत म्हणाले कि तुमच्या आईला लंडनमधील हवामानाचा अंदाज नसावा त्यामुळे त्यांनी शपथ घेतली असावी. परिस्थिती माहित असती तर आईनी अशी शपथ घेतलीच नसती त्यामुळे तुम्ही मांस खा. परंतु ‘‘आता आईने सांगितलं तरी मी मांस खाणार नाही,’’ असं म्हणत बापूनी पुन्हा नकार दिला आणि डॉक्टरांना विचारले

“तुम्हाला असं म्हणायचं आहे का, मी मांस खाल्ले तरच जगेन अथवा मृत्यू होईल ?”

त्यावर डॉक्टर म्हणाले जगणं मरण तर सर्वस्वी वरच्याच्या हातात आहे. यावर गांधींची उच्चारले “जरी जगणं मरण वरच्याच्या हातात असले तरी प्रतिज्ञा पूर्ण करणे हे खालच्यांच्या हातात आहे” आणि त्यांनी आईला दिलेली प्रतिज्ञा अक्षरशः आपले प्राण पणाला लावून पालन करत मांसाहार केलाच नाही सुदैवाने बापूजी यातून पुढे बरे झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More