Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

निवृत्त झालेल्या क्रिकेटर्सला BCCI किती पेन्शन देते ?

34

क्रिकेट खेळताना खेळाडूंना जो पैसा मिळत राहतो तो रिटायर झाल्यावर बंद होतो मात्र त्यांना पेन्शन सुरु होते. रिटायर झालेल्या खेळाडूंना किती पेन्शन मिळते ?

क्रिकेटर्सबद्दल एक कुतूहल, जिज्ञासा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात असते. त्यांची लाइफस्टाइल पिक्चर्समधील हिरोंपेक्षा कमी नसते. ते लोकप्रिय असतात, त्यांच्या प्रगतीचा आलेख चढता असतो तोवर ते फारच लोकप्रिय असतात.

परंतु वाढतं वय त्यांच्या खेळण्यातला स्टॅमिना कमी करतं ज्याचा परिणाम त्यांच्या खेळण्यावर होऊ लागतो आणि मग अर्थातच त्यांना निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यांच्या भोवतालचं वलय, त्यांची प्रसिद्धी ओसरू लागते, त्याचप्रमाणे त्यांना मिळणाऱ्या प्रचंड पैशांची आवकही बंद होते.

परंतु यात एक जमेची बाजू अशी की क्रिकेट खेळताना त्यांना जो पैसा मिळत राहतो, केवळ तो बंद होतो आणि सुरू होते ती पेन्शन… निवृत्त क्रिकेटर्सला सुद्धा पेन्शन लागू आहे ती अशी –

१९९३ च्या आधी २५ किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळलेल्यांना ५००००रु. प्रति माह तर २००३-४ च्या सिझनच्या शेवटपर्यंत ५० ते ७४ मॅचेस किंवा ७५ पेक्षा जास्त प्रथम श्रेणी मॅचेस खेळलेल्यांना २२५००-३०००० प्रति माह पेन्शन मिळते.

BCCI ने ही राशी २०१९ मध्ये वाढवली. त्यांच्या ए+, ए, बी व सी अशा श्रेण्या आहेत. ए+ श्रेणी क्रिकेटर्सना प्रत्येक वर्षी ७ करोड, ए श्रेणी क्रिकेटीयर्सना दर वर्षी ५ करोड, बी व सी श्रेणी क्रिकेटीयर्सना अनुक्रमे ३ करोड व १ करोड प्रति वर्ष अशी ही पेन्शन लागू आहे.

यापूर्वी ज्यांनी एक दिवसीय व टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत अशांनाच पेन्शन लागू असायची. ICC ने २०१५ मध्ये यात परिवर्तन केलं. १ जानेवारी २०१५ पासून पेन्शन डबल झाली आहे.

३१ डिसेंबर १९९३ च्या आधी निवृत्त होणाऱ्या ज्यांनी २५ पेक्षा कमी टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत त्यांना ३७,५०० रु प्रति महिना पेन्शन मिळते. तर १ जानेवारी १९९४ला किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्यांना २२,५०० रु. प्रति महिना पेन्शन मिळते.

वन डे इंटरनॅशनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या क्रिकेटर्सना १५,००० रु प्रति माह पेन्शन मिळते. १९५७-५८ सिझनच्या आधी कमीत कमी १० रणजी मॅच खेळणाऱ्या क्रिकेटर्सना तर २००४-५ या सिझनमध्ये २५ ते ४९ मॅचेस खेळणाऱ्या क्रिकेटर्सना १५,०००रु. प्रति महिना पेन्शन मिळते. तर ज्या क्रिकेटर्सनी २००३-४ च्या सीझनमध्ये ५०-७४ मॅचेस किंवा ७५ पेक्षा जास्त प्रथम श्रेणी मॅचेस खेळल्या आहेत त्यांना २२,५००-३०,००० रु प्रति माह पेन्शन मिळते.

१० किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळलेल्या महिला क्रिकेटर्सना २२,५०० रु. तर ५-९ टेस्ट मॅचेस खेळलेल्या महिला क्रिकेटर्सना १५,००० रु प्रति महिना पेन्शन लागू आहे. निवृत्त अंपायर्सना प्रति महिना २२,५०० रु. तर अखिल भारतीय पॅनलच्या एक दिवसीय फिल्ड अंपायर्सना १५,००० रु. प्रति महिना पेन्शन मिळते.

बीसीसीआय वन टाइम पेन्शन स्कीम (BCCI One Time Pension Scheme)

२००३-४ सिझनच्या शेवटपर्यंत १०० पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळणाऱ्या क्रिकेटीयर्सना १.५ करोड, ७५-९९ टेस्ट मॅचेस व ५०-७४ टेस्ट मॅचेस खेळणाऱ्या क्रिकेटर्सना अनुक्रमे १ करोड व 75 लाख रु. वन टाइम पेन्शनची योजना आहे.

२००३-४ या सीझनमध्ये २५-४९ टेस्ट मॅच खेळणाऱ्या क्रिकेटर्सना ६० लाख रु. तर १०-२४ टेस्ट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना ५० लाख रु. वन टाइम पेन्शन मिळते. १-९ टेस्ट मॅचेस खेळणाऱ्या ३५ लाख रु. वन टाइम पेन्शन मिळते.

१०० पेक्षा अधिक टेस्ट मॅचेस खेळणाऱ्या व ७५-९९ टेस्ट मॅचेस खेळणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटीयर्सना अनुक्रमे ३० लाख व २५ लाख रु. वन टाइम पेन्शन मिळते. BCCI ने “उदार नीती” चा अवलंब करत प्रथम श्रेणी क्रिकेटर्स व अंपायर्स ज्यांनी १० पेक्षा जास्त प्रथम श्रेणी मॅचेस खेळल्या आहेत किंवा अंपायरिंग केली आहे, त्यांना ५ लाख वन टाइम पेन्शन मिळते.

निवृत्त क्रिकेटर्ससाठी केलेली ही तरतूद खरंच वाखाणण्याजोगी आहे. जे क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून आपल्या देशासाठी जे बहुमूल्य योगदान करतात, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना योग्य तो सन्मान देण्यासाठी क्रिकेट जगताने उचललेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More