Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.
sex watch porn http://hdmadthumbs.com

चहाला टक्कर देणाऱ्या कॉफीचा शोध काही बकऱ्यांनी लावला होता

67

एकेकाळी काही देशांमध्ये कॉफीवर बंदी घालण्यात होती, जागतिक कॉफी दिनानिमित्त जाणून घ्या ह्याच कॉफीबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी

भारतीय लोकांच्या मनात कॉफीची जागा अबाधित आहे. कॉफीचा तो सुवासच मला तर आपल्याकडे खेचून घेतो. तर एका Coffee च्या कपासोबत अनेक आठवणी मनात तरळून जातात.

पावसाळ्यात तर एक खिडकी आणि एक कॉफी हे स्वर्गिय कॉम्बिनेशन आहे. त्याला पुस्तकाची साथ लाभली तर क्या बात है. आपल्याकडे चहाप्रेमी लोकांइतकेच कॉफीप्रेमी लोक काही कमी नाहीत.

कॉफी पिण्याआधी तिचा तो स्वर्गीय अरोमा नाकात भरून मग तिचा आस्वाद घेताना मनात विचार आला तो कॉफीविषयी अधिक जाणून घेण्याविषयी. आवडीने प्यायल्या जाणाऱ्या कॉफीविषयी मग मनात विचार आला की जी माहिती मिळाली ती तुमच्याबरोबर शेअर करूया.

coffee interesting facts, fun facts about coffee in marathi, coffee history, coffee facts 2020, benefits of coffee in marathi, coffee facts health, international coffee day, history of coffee beans, coffee disadvantages, side effects of coffee in marathi, coffee history facts, कॉफीचा शोध, कॉफी माहिती, कॉफीचा इतिहास, कॉफी पिण्याचे फायदे, नुकसान, health benefits of coffee

कॉफीबाबत काही रंजक माहिती (Interesting facts about coffee)

जगातील दुसरी मोठी व्यापारी वस्तू

जगात सर्वात अधिक व्यापार हा कच्च्या तेलाचा होतो. असं म्हणतात त्यानंतर कॉफीचे स्थान आहे. जगभरातच कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते, ते खूप लोकप्रिय पेयही आहे.

अमेरिकेत फक्त हवाईमध्ये उत्पादन

Coffee उंच स्थानी आणि उष्णकटिबंधीय वातावरणात तसेच पोषक मातीमध्ये पिकते. त्यामुळे अमेरिकेत केवळ हवाई या राज्यातच कॉफीचे उत्पादन होऊ शकत असे. हल्ली कॅलिफोर्नियामध्ये तुरळक प्रमाणात कॉफीची शेती केली जाते.

फळापासून कॉफी

कॉफीचे झुडुप असते आणि त्याला चेरीसारखी फळे येतात. त्याला कॉफी बिन्स म्हणतात. त्यावर प्रक्रिया करून कॉफी पावडर तयार केली जाते.

coffee interesting facts, fun facts about coffee in marathi, coffee history, coffee facts 2020, benefits of coffee in marathi, coffee facts health, international coffee day, history of coffee beans, coffee disadvantages, side effects of coffee in marathi, coffee history facts, कॉफीचा शोध, कॉफी माहिती, कॉफीचा इतिहास, कॉफी पिण्याचे फायदे, नुकसान, health benefits of coffee

महागडी कॉफी आणि मांजराची विष्ठा

इंडोनेशियातील कोपी लुवॅक (Kopi luwak) ही कॉफी सर्वात महागडी आहे. कारण या कॉफीच्या बिया Palm Civet नावाच्या प्रजातीच्या मांजरीकडून पचवल्या जातात. त्यासाठी तिच्या विष्ठेचा वापर केला जातो.

आपण कितीही नाके मुरडली तरीही ही जगातील सर्वात महागडी कॉफी असल्याचे आपण नाकारू शकत नाही शिवाय या मांजराच्या विष्ठेतून आल्याने तिची चवही वेगळीच लागते म्हणे.

या कॉफीची किंमत ऐकून आपल्या डोळ्यासमोर चांदण्याच चमकतील कारण या कॉफीची प्रतिकिलो किंमत आहे 28 हजार रूपये.

वर्षाची कॉफी आयफोनच्या किंमतीएवढी

एक अमेरिकन व्यक्ती सरासरी 1092 डॉलर्स प्रति वर्षी कॉफीवर खर्च करतो. एवढ्या खर्चात एक नवा आयफोन एक्स मोबाईल जरूर विकत घेता येईल. तरूणाई कॉफीवर अधिक खर्च करते.

ब्राझील सर्वात मोठा उत्पादक

कॉफीचे सर्वाधिक उत्पादन ब्राझील मध्ये होते. दीडशे वर्षांपासून ब्राझील जगाला सर्वाधिक कॉफी पावडरची निर्यात करतो.

कॉफीचा व्यापार

स्टारबक्स हा जगातील कॉफी स्टोअरचा मोठा ब्रांड आहे. 1971 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन मध्ये पहिले Starbucks स्टोअर उघडण्यात आले होते. जगभरात त्याची 29 हजार पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.

एक कप कॉफीत 2 कॅलरी

काही संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की एक कप ब्लॅक कॉफीमध्ये 2 कॅलरी असतात. त्यातही डिकॅफिनेटड बियांची कॉफी प्यायली तर त्यात 0 उष्मांक असतात.

कॉफीची इतिहास (History of Coffee)

कॉफीचा शोध लागला तो इथियोपियामध्ये. कॅफिया अरेबिका (Coffea arabica) हे कॉफीच्या झाडाचे शास्त्रिय नाव आहे. आता कॉफीचा शोध नेमका कसा लागला ही गोष्ट गमतीशीर आहे बरं का. तर बकऱ्यांच्या कळपाने कॉफीचा शोध लावला.

बकरीच्या कळपाने एका प्रकारची रोपे खाल्ली त्यानंतर बकऱ्या अधिक उत्साही झाल्याचे दिसले. त्या रात्री त्या झोपल्या देखील नाही. मग बकऱ्यांच्या मालकाने त्या बिया खाल्ल्या तेव्हा तोही अतिउत्साहाने नाचू लागला.

coffee interesting facts, fun facts about coffee in marathi, coffee history, coffee facts 2020, benefits of coffee in marathi, coffee facts health, international coffee day, history of coffee beans, coffee disadvantages, side effects of coffee in marathi, coffee history facts, कॉफीचा शोध, कॉफी माहिती, कॉफीचा इतिहास, कॉफी पिण्याचे फायदे, नुकसान, health benefits of coffee

एका भिक्खूने हे पाहून मेंढपाळाला विचारले की तेव्हा त्याने या बिया दाखवल्या. त्या बियांपासून पेय बनवून भिक्खूने प्यायले. तेव्हा खूप वेळ झोप येत नाही हे त्याच्या लक्षात आले. अशी कथा सांगितली जाते. प्रत्यक्षातही कॉफीची पाने पाण्यात उकळवून ते पिण्याचा प्रघात इथोपियामध्ये होता.

याव्यतिरिक्तही कॉफीच्या जन्माच्या काही कथा सांगितल्या जातात. पण आपण भारतीय कॉफीचा इतिहास विचारात घेऊया.

17 व्या शतकात बाबा बुडान नामक एक यात्रेकरू जो मक्केला गेला होता त्याने कॉफी बियांची तस्करी केली. त्याने लपवून या बिया आणल्या आणि चिकमंगळूर की मैसूरमध्ये कॉफीच्या रोपाची लागवड केली.

दक्षिण भारतामध्ये कॉफीचे भरपूर उत्पादन घेतले जाते. वास्तविक कॉफी उष्ण प्रदेशात तयार होते. कॉफीचे लहानसे झुडुप असते. त्याचे दोन प्रकार असतात एक कॉफी अरेबिका आणि दुसरी म्हणजे कॉफी रोबस्टा. कॉफीला चेरीच्या आकाराची फळे येतात, त्यांचा रंग लाल जांभळा कधी पिवळ्या रंगाची फळे असतात.

कॉफीच्या बिया भाजून त्यांची पावडर केली जाते आणि त्याला विशिष्ट सुवास येतो. कॉफीमध्ये कॅफीन, टॅनिक आणि कलॉल नावाचे तेलद्रव्य असते. हे तेल उडून जाऊ शकते. आपण जी कॉफी बाजारातून आणतो त्यात चिकोरी नावाचे द्रव्यही मिसळले जाते, त्यामुळे कॉफीची विशिष्ट चव येते.

coffee interesting facts, fun facts about coffee in marathi, coffee history, coffee facts 2020, benefits of coffee in marathi, coffee facts health, international coffee day, history of coffee beans, coffee disadvantages, side effects of coffee in marathi, coffee history facts, कॉफीचा शोध, कॉफी माहिती, कॉफीचा इतिहास, कॉफी पिण्याचे फायदे, नुकसान, health benefits of coffee

कॉफीला ‘Coffee’ हा प्रचलित शब्दही 16 व्या शतकात मिळाला आहे. कॉफी आता आपल्याकडे थंड, गरम, कपाचिनो वगैरे अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. कॉफीप्रेमींसाठी कॉफीचे विविध प्रकार. समजावून घ्या अगदी सोप्या भाषेत.

कॉफीला निषेधाचा सामना करावा लागला होताच. सुरूवातीच्या काळात कॉफी पिणे अधार्मिक कृत्य मानले जात होते. कॉफी भारतात आली ती मक्केतून. मात्र 1511 सालामध्ये खुद्द मक्केत कॉफीवर निर्बंध लादण्यात आले होते. कॉफीचे सेवन आळसाला प्रोत्साहन देते असा समज होता.

कॉफी सेवनाचे फायदे (Benefits of drinking Coffee)

कॉफी पिणाऱ्या व्यक्ती दीर्घायुषी

एका संशोधनानुसार ज्या व्यक्ती दिवसभरात तीन चार कप कॉफी सेवन करतात त्या दीर्घ काळ जगतात, असे संशोधनात आढळले आहे. हृदयरोग, टाईप 2 मधुमेह, पार्किसन्स या आजारापासून कॉफी बचाव करते.

वजन कमी करते

कॉफी प्यायल्याने मेटाबोलिक दर 3 ते 11 टक्के पर्यंत वाढतो. त्यामुळे कॉफी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

आजारांपासून बचाव

कॉफी सेवनामुळे काही आरोग्यफायदे होतात. जसे अल्झायमर, डिमेन्शिआ आणि यकृतासाठीही कॉफी सेवनाचे फायदे होतात.

जिममध्ये व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त

व्यायामाआधी ब्लॅक कॉफी प्यायल्यास व्यायाम करताना फायदा होतो. तर व्यायामानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्यास स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

मधुमेहाच्या दुसऱ्या प्रकाराचा धोका कमी

कॉफीमध्ये कॅफीन असते ते मधुमेहात इन्सुलिनची संवेदनशीलता कमी करते तर ग्लुकोजचा परिणाम कमी करते. त्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

कॉफी पिणाऱ्यांचा डीएनए अधिक चांगला

कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा डीएनए उत्तम असतो. या व्यक्तींच्या रक्ताच्या लिम्फोसाईटमध्ये डीएनए स्ट्रँडस कमी असतात.

कॉफीमुळे होणारे नुकसान (Side effects of drinking Coffee)

वाईट गुणवत्तेची कॉफी

उत्तम दर्जाच्या कॉफीचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. भेसळीच्या जमान्यात कॉफी पावडरमध्येही भेसळ होतेच. तसेच खराब दाण्यांपासून कॉफी तयार केली जाते. अशा कॉफीच्या सेवनाने आजारपण येऊ शकते.

कॉफीचे अतिसेवन घातक

कॉफी प्रेमी लोक दिवसातून तीन काय अनेक वेळा कॉफी रिचवतात. कॉफीचे फायदे असले तरीही त्याच्या अतिसेवनाचे धोकेही नाकारता येत नाही. जर एखादी व्यक्ती कमी वेळात 80-100 कप कॉफी पित असेल तर शरीरासाठी कॉफी निश्चितच घातक ठरू शकते.

एवढी कॉफी प्यायल्यास शरीरात 10-13 ग्रॅम कॅफिनचे प्रमाण निर्माण होईल. त्यामुळे शरीर इतक्या प्रमाणातील कॉफी पचवू शकणार नाही आणि उलटी होईल. काही लोकांमध्ये जीवाचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

गर्भावस्थेत कॉफी टाळावी

सगळ्यांनीच कॉफीचे सेवन मर्यादशीर करावे. त्यातही गर्भवती स्त्रियांनी कॉफीचे सेवन टाळलेले बरे. प्यायचीच असेल तर 1 कपापेक्षा अधिक प्रमाणात कॉफी पिऊ नये.

कॉफीमध्ये कॅफिन असते, त्याचा थेट परिणाम थेट गर्भावर होतो. त्यामुळे कॉफीचे अतिसेवन गर्भासाठी धोकादायक असते.

अतिप्रमाणातील कॉफी नुकसानकारक

कॉफीचे अतिसेवन केल्यास शरीरात गेलेल्या कॅफिनचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. कॉफी प्यायल्याने तरतरी वाटत असली तरीही काही समस्या जरूर निर्माण होऊ शकतात.

अतिप्रमाणातील कॉफीचे सेवन केल्यास अनिद्रा, बेचैनी, उलट्या, पोट खराब होणे, डोकेदुखी, घाबरल्यासारखे होणे, कानात आवाज येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे असेही धोके निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे थोडक्यात गोडी मानून प्रमाणशीर कॉफीचे सेवन करणेच योग्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

sexe amateur www.gotporn.pro i just cum on my mother in law. sexy indian gets her small boobs.yes porn please

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More